शाश्वत आणि हरित विकासाकडे चित्रनगरीचं पाऊल माझी चित्रनगरी, हरित चित्रनगरी; उपक्रमाचे उद्घाटन
Mumbai
मुंबई 3 फेब्रुवारी : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका, इंडियन पोलुशन कंट्रोल असोसिएशन व बी द चेंज संस्था यांच्या वतीने आजपासून (3 फेब्रुवारी 2025) चित्रनगरीत शाश्वत व हरित चित्रनगरी सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते नुकताच या उपक्रमाचा उद्धाटन सोहळा संपन्न झाला. एक पाऊल शाश्वत व हरित चित्रनगरीकरिता या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. 3 ते 8 फेब्रुवारीदरम्यान गोरेगावच्या चित्रनगरीत 'माझी चित्रनगरी, हरित चित्रनगरी!', 'स्वच्छ व हरित फिल्मसिटी' या घोषवाक्यांतर्गत हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने चित्रनगरीला अधिक हरित बनवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखावित्ताधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, उप अभियंता विजय बापट, महानगर पालिकेचे दुय्यम अभियंता सागर हेद्रे, सहाय्यक मुख्यपर्यवेक्षक श्याम शिंदे, पर्यवेक्षक सुरेश गांगुर्डे, कनिष्ठ पर्यवेक्षक संदिप मयेकर, आयपीसीए संस्थेचे प्रविण गवांडे, आयपीसीएचे मेघा धुरी तसेच बी.द.चेंज या संस्थेचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.